भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे बोल नव्हती फोल । जाणें विठ्ठल अंतरींचे

majhe bol navhati phol | janen viththal antarinche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझे बोल नव्हती फोल । जाणें विठ्ठल अंतरींचे ॥१॥ पुरवील तोचि मनींचा हेत । येईल धांवत करुणाब्धी ॥२॥ वागवितो दया पोटीं । आम्हांसाठी कृपाळु ॥३॥ निळा म्हणे भरंवसेनि । नामें वदनीं आळवितां ॥४॥