भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो

majhaya mipanacha karoni pharal | uralen khavayasi baisala sakal | aisa bhukalu ha nandacha goval | yasi na purechi grasitan majha khel vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥ आतां काय देऊं नसंता जवळी । संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥ भक्षिलें संपत्ती विपत्तीचे भोग । कांही नुरविताचि कोणाचाही भाग । अवघे भक्षूनियां नुरवि हा माग । नामरुप तेंही नेदीचि उरों सोंग वो ॥३॥ ऐसा भक्षूनियां पूर्ण नव्हे कधी । अवघ्या भक्षूनियां संसारउपाधी । जीव भवाचिया नुरवूनियां आधीं । केले येका येकि निजरुप अनादि वो ॥४॥ आधीचि दुर्बळ मी नव्हति कांही जोडी । पूर्वीच भक्षूनियां गेला वो तातडी । आणूं कोठूनि वाढूं या परवडी । हा तो भुकाळुचि सदाचा बराडी वो ॥५॥ आतां तृप्तीलागीं दिसें एक शेवटीं । भावभक्ति याचे वोगरीन ताटीं । तेणेचि होईल हा क्षुघेचि संतुष्टी । ऐसें निळा म्हणे विचारिलें पोटीं वो ॥६॥