भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत

majhiya manen dharila vishvas | tumachya namin ghatali kas | nahin upeksha ani alas | tumachya thayin sharanangat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥ बहुतां सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुडावा । बहुतां दानें वाढल्या सेवा । बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥ बहुतीं गाईलें तुम्हां गीतीं । बहुतीं स्तपिलें तुम्हां स्तुतीं । बहुतां ध्यानीं तुमची मूर्ती । आलिंगिली हदयांत ॥३॥ बहुतीं तुम्हां आराधिलें । बहुतीं पूजनीं तुम्हां पूजिलें । बहुतीं यज्ञावदानीं याजिलें । बहुती पाहिलें ज्ञानदृष्टीं ॥४॥ बहुतीं वेदस्तवनमिसें । तुमतें कवळिलें मानसें । बहुतीं योगादि सायासें । लाविलें पिसें आपणीया ॥५॥ तुम्ही पुरलेती त्यांचीया भावा । सर्वज्ञपणें जी व्यापक देवा । घेऊनिया सेवा आपुलिया गांवा । नेलें केशवा निजवस्ती ॥६॥ ऐशी ऐकोनियां संतवाणी । मिठी विश्वासें घातली चरणीं । निळा म्हणे माझी आरुषवाणी । लावावी गुणीं आपुलिये ॥७॥