भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥ वाफलें तें वरावरी । कणिसें दाट आल्या घुमरी । पिकलें न समाये अंबरीं । चहुकोनि सारिखेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥ दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥ देहीं प्रगटे रोगव्याधी । तेणें आहाळली तापे बुध्दी । लोळे न पुरे दु:खावधी । आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भूतीं भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता । नाढळे गुणदोष वार्ता । नमन नम्रता त्यां अंगी ॥१॥ धन्य त्यांचे जन्मकर्म । सम नाढळे ज्या विषम । गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निर्लोभ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥ मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥ न पाहे मानप्रतिष्ठा त्याची । घेतली ज्याची सुति येणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भ्याला देव देखोनि भक्तां । म्हणे मी आतां केउता पळों ॥१॥ जीवेंसीचि इहीं केली साठी । सांडवितां मिठी न सोडिती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग ओवाळूनियां मृतिका । घेतलें उचलुनि यदुनायका । यशोदा म्हणे हे बाळका । वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥ नव्हे शकटे तो मायावी दैत्य । आला होता करावया घात । कृष्ण ताडिला तो यथार्थ । पूतनेऐशी परी केली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळा भीतरीं । तंव धावोनियां नरनारी । लोटांगणे घालिती ॥१॥ मेघीं सांगता सूरपती । आनंदला होता चित्तीं । तोचि आला गोकुळाप्रती । निज नयनीं पहावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा