भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं भगवंत देखिला । मानामान सहजचि गेला

bhutin bhagavant dekhila | manaman sahajachi gela

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भूतीं भगवंत देखिला । मानामान सहजचि गेला ॥१॥ तुमचे कृपेचि हे जाती । स्वरुपीं वेध झाला वृत्ती ॥२॥ व्देषाव्देष निंदा नेणे । चिंता असूया पळती भेणें ॥३॥ निळा म्हणे भूतमांत्रीं । झाला कृपेसी तो धात्री ॥४॥