भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता । नाढळे गुणदोष वार्ता । नमन नम्रता त्यां अंगी

bhutin bhutatma dekhatan | theli jadoni ekatmata | nadhale gunadosh varta | naman namrata tyan angi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भूतीं भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता । नाढळे गुणदोष वार्ता । नमन नम्रता त्यां अंगी ॥१॥ धन्य त्यांचे जन्मकर्म । सम नाढळे ज्या विषम । गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निर्लोभ ॥२॥ संकल्प नासले विकल्प । पुण्य कैंचें तया पाप । ठेलें सवरुपीं स्वरुप । विठ्ठल रुप विठठलीं ॥३॥ अहंकार नुरे उरीं । झाले व्यापक चराचरीं । निजानंदाची उजरी । सन्मुख तयां सर्वदा ॥४॥ निळा म्हणे स्थैर्यबुध्दी । निंर्दंव्द झाले निजात्मबुध्दी । सच्चिदानंद पदोपदीं । कैवल्यसुखें डुल्लती ॥५॥