भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळा भीतरीं । तंव धावोनियां नरनारी । लोटांगणे घालिती

mag to utaruniyan giri | ale gokula bhitarin | tanv dhavoniyan naranari | lotangane ghaliti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळा भीतरीं । तंव धावोनियां नरनारी । लोटांगणे घालिती ॥१॥ मेघीं सांगता सूरपती । आनंदला होता चित्तीं । तोचि आला गोकुळाप्रती । निज नयनीं पहावया ॥२॥ तंव तों गोंवळ पहिलियाची ऐसे । केळवती का नोवरे जैसे । गाई चौताळताती हर्षे । तैसेचि गोकुळींहिं स्वानंदें । गौळी गौळणी मिरवती ॥४॥ इंद्र देखोनियां ते दृष्टी । विस्मयापन्न झाला पोटीं । म्हणे संवर्तकाचिये वृष्टी । पुढें कैसी वांचली हीं ॥५॥ तस्मात परमात्मा हा श्रीहरी । कृष्णवेषें महीवरी । अवतरला जाणेनियां अंतरीं । स्तवन करी निज मूखें ॥६॥ निळा म्हणे शरणांगत । म्हणवी घाली दंडवत । त्राहें त्राहें म्यां महिमा नेणत । केला अपराध क्षमा कीजे ॥७॥