भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप

bhutin upadrav didhala | tadila athava nistejila | tenen chitti daho jala | adhibhautik bolila to tap

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥ देहीं प्रगटे रोगव्याधी । तेणें आहाळली तापे बुध्दी । लोळे न पुरे दु:खावधी । आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥ दैवें अतिवृष्टि का अनावृष्टि । रजीकें लुटिलें जाला कष्टी । आगीनें जळतां नावरें संकटीं । तो अधिदैव ताप बोलिजे ॥३॥ ऐसे त्रिविधताप सत्संगती । विवकेश्रवणें विलया जाती । म्हणोनि कीर्तनी बुध्दिमंतीं । आवश्य श्रवणार्थी बैसावें ॥४॥ निळा म्हणे होईल लाभ । ब्रम्हानंदा निघती कोंभ । प्रसन्न होउनी पद्मनाभ । शीतळ करील सर्वार्थीं ॥५॥