भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥१॥ येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती । धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला । न वजे दुरी उभा ठेला । अवघा झाला त्यांचाचि ॥१॥ भक्तवचनें ऐके कानीं । भक्त आवडी पाहे नयनीं । भक्त ह्रदयीं आलिंगुनी । निज ऐश्वर्य अर्पी त्यां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥ म्हणे केले ते पावले उपचार । तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार । झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर । पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥ आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा