भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यें जोडे सत्संगती । जरि होय हातीं सुकृती

bhagyen jode satsangati | jari hoy hatin sukruti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाग्यें जोडे सत्संगती । जरि होय हातीं सुकृती ॥१॥ भाव शूध्द संचित गांठीं । तरीच भेटी तयांसवें ॥२॥ शुध्दचर्या आचरण । लाभती चरण तरि हातीं ॥३॥ निळा म्हणे सज्जनसंग । देवा भाग दुर्लभ तो ॥४॥