भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविक गोवळ

bhavik goval

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाविक गोवळ । अंगी विश्वासाचें बळ ॥१॥ तेणें स्थिरावली बुध्दी । निश्चळ झाली हरीच्या पदीं ॥२॥ नाही ओढा वारा । चित्तीं चैतन्याचा थारा ॥३॥ निळा म्हणे हरीच्यासंगें । करिती क्रीडा नानारंगें ॥४॥\