भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसवितां ॥१॥ नयनाचि माजीं नवचे दुरीं । आंतु बाहेरीं कोंदला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें ॥१॥ वढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला ॥१॥ वाजविती पावे मोह्या घमुती । छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलणें त्याचें तें नि:शब्द । देखणें देखती सच्चिदानंद । करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय बहमरुप ॥१॥ जाणें येणें आणिकां दिसें । अचळपणें तें जैसें तैसें । कल्लोळ सागरीं उससे । रश्मि जैसे निजबिंबीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥ सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥ जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं ॥१॥ म्हणे आजी हें नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें । ब्रीद आपुलें साच केलें । सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥ एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥ रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव । भक्तहीन भाव अपुरता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा