भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते

bolile shabda nishchayachen | pratiti sache ale te

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते ॥१॥ माझा मजचि परिचय झाला । संती दाविला हितार्थ ॥२॥ निमिषमात्रें सावध केलें । आपुलिये लाविलें निजसेवें ॥३॥ निळा म्हणे उपकार त्यांचा । सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥