भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं

bramha vichar kari mani | thakada motha ha chakrapani | ata yeil anchavani | tethen uchchhishta svikarun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥ एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥ तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा अंचवण । न घेई तो आम्हां सज्जन । जिवलग प्राण निजांचा ॥३॥ गोंवळ म्हणती भलाभला । मनींचाचि हेत जाणितला । आजीचिया धणी जो जो धला । तो तो पावला समाधीसुखा ॥४॥ ऐसें बोलानियां गोंवळ । बैसले आत्मस्थितीचि निश्रचळ । तंव ब्रम्हा डोहीं करी तळमळ । कां पां न येतिची आझुनी ॥५॥ मग डोकाउनी बाहेरी पाहें । मागुती जळी लीन होये । म्हणे मी ब्रम्हा आणि विचंबला ठाय । धिग महत्व ते माझें ॥६॥ चोरुनियां वत्सें गोंवळ । नेंऊ आडवूं हा गोपाळ । सत्ता बळें घेऊनि कवळ । मग ते देऊं याचें या ॥७॥ ऐसें विचारुनियां परमेष्टी । राहिला निश्रचळ कातरदृष्टी । निळा म्हणे हेंही जगजेठी । हदगत तयाचें ॥८॥