भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलविला बोले वेद । म्हैसा सुबुध्द स्वरान्वयें

bolavila bole ved | mhaisa subudhda svaranvayen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलविला बोले वेद । म्हैसा सुबुध्द स्वरान्वयें ॥१॥ काय एक न करा देवा । भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥ शिष्यालागीं देतां बोध । नलगे पलाघे निमिष्यहि ॥३॥ निळा म्हणे ज्ञानेश्वरा । मजहि अंगिकारा रंका दीना ॥४॥