भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान

bhagya majhen ubhen thelen | santi davilen nidhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥ आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥ जेथें पाहे तेथें आहे । न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥ निळा म्हणे व्यापुनी अंतरी । गगनाही बाहेरीं तेंचि दिसे ॥४॥