भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो

bhavabhaktichiya pritin jevavila | deuni dhekar vo purnapanen ghala | nenon anandacha pravah lotala | aisiya svanandachin vachanen anuvadala vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥ म्हणे केले ते पावले उपचार । तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार । झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर । पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥ तातल्या सोसूनियां विरक्तिच्या ज्वाळा । बरव्या शिजविल्या समृध्दी सकळा । झाला रसस्वाद भोजनीं आगळा । वाढिलीं पंचामृतें जेवतां जे वेळोवेळां वो ॥३॥ ऐसें जेऊनियां घाले विश्वंभर । भक्ता उभविला अभयाचा कर । काढुनी घालिती कठींचे तुळसीहार । निळया स्वामी गौरविती वारंवार वो ॥४॥