भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों

bhaven alavitan deva | lagala hatin junat theva | daiv modini ale daiva | sukh vishranti pavalon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥ आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥ अपार संपत्ती आली घरां । नाहीं आतां वोढावारा । नलगे जाणें आणिकांच्या घरां । कांहीं मागावें यासाठीं ॥३॥ खरें नाणें खरें केणें । खरिया मोलें घेणें देणें । खरें विकें खरेपणें । न पडे उणें भरलेंसे ॥४॥ निळा म्हणे माझिया दैवें । जोडिलें होतें पडिलें ठावें । कृपा केली विठ्ठल देवें । दिधलें भांडार ॥५॥