भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकाची आवडी देवा । करी सेवा निज प्रीतीं

bhavikachi avadi deva | kari seva nij pritin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाविकाची आवडी देवा । करी सेवा निज प्रीतीं ॥१॥ हिंडे तया मागें पुढें । नाशी कोडे सकळही ॥२॥ घरीं दारीं वसे हरी । विश्वंभरी भाव ज्या ॥३॥ निळा म्हणे संदेह नाहीं । भक्तां पाही यावरीं ॥४॥