नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां
nahin sandeh kari ha path | pavasi vaikunth hari mhanatan
नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥ जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥
nahin sandeh kari ha path | pavasi vaikunth hari mhanatan
नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥ जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥
nahinchi urala rita | thavo yavin tatvatan
नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥ अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥
nahinchi kelen samadhan | majhen mhanavun kshiti vate
नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥ आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥
nahinchi tumhan bhidachad | yethen karun alyati badabad | krushna majha avaghyansin god | tumhansi kan ge vit yacha
नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥ जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥
nahinchi ya dal mul | pahatan yasi jati kul
नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥ रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥
ni:sim bhav dekhoniyan hari | keli svikari puja tyachi
नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥ पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥
nij bhaktachi avadi | sambhali tya ghadi ghadin
निज भक्ताची आवडी । सांभाळी त्या घडी घडीं ॥१॥ राखोनियां भूक तहान । करी त्याचा बहुमान ॥२॥
nij sayasen joduni | hoten nikshepuni thevilen
निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥ तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥
nijadhyas lagala manin | hachi chintanin divasaratrin
निजध्यास लागला मनीं । हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥ न सुटेचि करुं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥२॥
nijatmapraptilagin sar | harichiya uchchar namacha
निजात्मप्राप्तीलागीं सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ हेंचि बीज हेंचि गुज । हेंचि निज निजाचें ॥२॥
nijanand bhusavala | viththal jhala rupakruti
निजानंद भुसावला । विठ्ठल झाला रुपाकृती ॥१॥ तेणें लाचविलीं मानसें । लाविलें पिसें संतजनां ॥२॥
nitya kathashravanin priti | chittavrutti arthatarin
नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥ तेचि आधिकारीं या सुखा । स्वानुभव निका पावती ॥२॥
nitya niramay sagarin | mathan karuni vicharashurin
नित्य निरामय सागरीं । मथन करुनी विचारशूरीं ॥१॥ कढिला नवनींताचा गोळा । तो हा विटेवरी सांवळा ॥२॥
nitya nutan gaun gun | karun jagaran kirtanin
नित्य नूतन गाऊं गुण । करुं जागरण कीर्तनीं ॥१॥ तेणें तुमची होईल कृपा । निरसन तापा भवरोगां ॥२॥
nitya nutan tumhi nave | amhin ton jiven venchato
नित्य नूतन तुम्ही नवे । आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥ जाणें येणें आम्हा आटी । कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥
nitya vadanin harichen nam | antarin prem visavalen
नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥ त्याच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥
nitya shriharichen athaviten gun | vadanin tyachiya vo namachen smaran | hradayin dharuniyan nijabhaven charan | kariten anudinin henchi anushthan vo
नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥ येथे आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥
nityananda pudhe anand to kon | vishayasukh bai bapuden ten kshin | jethen na sarechi vaikunthasadan | sheshashayi vo trikutabhuvan vo
नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥ नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊं संगसुख हरीच्या सांगातें । गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें । हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥
nityanandachiya ghara | vivek pailatira pavaviti
नित्यानंदाचिया घरा । विवेक पैलतीरा पावविती ॥१॥ तेचि सद्गुरु संतजन । निजात्मज्ञान फळदाते ॥२॥
nityanande ghoshen karitan harichen kirtan | shrote ani vakte hoti param pavan
नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥ आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥