भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें

nitya vadanin harichen nam | antarin prem visavalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥ त्याच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥ आवडती ते सर्वदा हरी । न वचे दुरी पासुनी त्यां ॥३॥ निळा म्हणे मेघ:श्याम । पुरवीं काम सर्व त्यांचें ॥४॥