भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो

nitya shriharichen athaviten gun | vadanin tyachiya vo namachen smaran | hradayin dharuniyan nijabhaven charan | kariten anudinin henchi anushthan vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥ येथे आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥ येथें आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं मागील भोगाया । आतां घडती तीं याते समर्पाया । नाहीं भय त्या निजस्थाना जावया वो ॥३॥ वाचें असत्याचा नेदी लागों वारा । केलें सांडणें वो देह संसारा । चित्तीं विषयाचा मोडियला थारा । नाहीं गुंतलें या दंभ अहंकारा वो ॥४॥ संतीं सांगितलें केलें तें जतन । नाहीं आज्ञें त्याचें केलें उल्लंघन । मतमतांतरां नाहीं दिल्हें मन । ह्रदयीं धरिलें या हरीचें चिंतन वो ॥५॥ कांही ठाकलें तें केलें लोकहित । काया वाचा वो हें वेचुनीयां चित्त । नाहीं वंचूनियां ठेविलें संचित । काळ याचिपरि सारियेला वो ॥६॥ नित्य नवा वो हा आवडीचा दिवस । केला करुनियां कीर्तनी उल्हास । नाहीं गोवियेला कोठें आशापाश । निळा म्हणे वर्तोनि उदास वो ॥७॥