भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ

nahinchi ya dal mul | pahatan yasi jati kul

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥ रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥ बाळ तरुण वयसा वृध्द । जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥ निळा म्हणे धरिला चित्तीं । कैंसा नेणों पूर्वी संतीं ॥४॥