भजनी मालिका
← भजनांकडे परत

निजानंद भुसावला । विठ्ठल झाला रुपाकृती

nijanand bhusavala | viththal jhala rupakruti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निजानंद भुसावला । विठ्ठल झाला रुपाकृती ॥१॥ तेणें लाचविलीं मानसें । लाविलें पिसें संतजनां ॥२॥ नित्य त्यातेंचि अवलोकिती । आणि वानिती गुण वाचें ॥३॥ निळा म्हणे नाचती रंगीं । करिती जगीं उत्साह ॥४॥