भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट ॥१॥ पाताळ फोडोनि किती आहे पुड । नाहीं आंत वाड नभ वरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी ॥१॥ माझ्या पातकांचा लागूं नेदी अंत । ऐसें माझें चित्त साक्ष असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥ समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥ दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नापिकाचे परि वरी बरी बोडी । परि अंतरींची वाढी उणी नव्हे ॥१॥ तैसें माझें मन न राहे समूळीं । प्रपंच कवळी दाही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं ॥१॥ देव आकारला नामरुपा आला । म्हणोनि स्थापिला नामवेदीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडिया ॥१॥ वेदांसी कानडें श्रुतीसी कानडें । परब्रह्म उघडें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव