भजनी मालिका
← भजनांकडे परत

नापिकाचे परि वरी बरी बोडी । परि अंतरींची वाढी उणी नव्हे

napikache pari vari bari bodi | pari antarinchi vadhi uni navhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नापिकाचे परि वरी बरी बोडी । परि अंतरींची वाढी उणी नव्हे ॥१॥ तैसें माझें मन न राहे समूळीं । प्रपंच कवळी दाही दिशा ॥२॥ भक्ति प्रेमभाव वरी वरी दावी । अंतरीं आटवी घराचार ॥३॥ मी लटिका जाण असे परोपरी । तारी भवसागरीं म्हणे नामा ॥४॥