भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥ नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥ नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥ कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥ गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥ हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥ कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नावडे प्रपंच तापत्रय माया । येईं धांवोनियां केशिराजा ॥१॥ भवभयें फार भ्यालों जन्मांतरा । चौर्‍यांशींचा फेरा बुडवितो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥ सद्‌‍गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी ॥१॥ न करितां खेद पुढें वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥ भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान ॥१॥ दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठ । पुढिलांसी वाटा यम-पंथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट ॥१॥ प्रपंचीं कर्दमीं गढोनियां ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥ परस्परें दु:ख देखतां वाढलें । धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निज गुज रुक्माई पुसे पंढरीनाथा । ठेवुनियां माथा चरणावरी ॥१॥ सर्वांहुनि पढियंते काय स्वामितातें । तें मज निरुतें सांगा स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती । जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं ॥१॥ सकाळीं उठोनि ऐकतों कीर्तन । तेणें समाधान मज होय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव