भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान

nahin paramartha potin dhanachi asha | dharuni havyasa dhanaman

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान ॥१॥ दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठ । पुढिलांसी वाटा यम-पंथें ॥२॥ पंथ न चुकती संतांवीण कधीं । संसारसंबंधीं तया नरा ॥३॥ नामा ह्मणे ऐसे बहू अभाविक । संतसंगसुख काय जाणे ॥४॥