भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट

nahin bhakti namin chandal pataki | tochi janava lokin dushta nashta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट ॥१॥ प्रपंचीं कर्दमीं गढोनियां ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥ काढितां त्या वाटे प्रपंचाचें दुःख । विषयाचें सुख हर्ष बहु ॥३॥ पुत्र वित्त कांता मानी भरंवसा । पडे मोह फांसा जन्मवरी ॥४॥ नामदेव म्हणे अंतीं आहे कोण । कळा नामाविण नानापरी ॥५॥