भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज आत्मज्ञान डोहीं । जे बुडोन गेले पाहीं

nij atmadnyan dohin | je budon gele pahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निज आत्मज्ञान डोहीं । जे बुडोन गेले पाहीं ॥१॥ तनु त्याग होतां त्यांची । मग सगुणा भेटी कैंची ॥२॥ अहंभाव वांटून प्याले । ते जिवंतचि मुक्त झाले ॥३॥ केशव म्हणे डोळां । ते पहावे वेळोवेळां ॥४॥