भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें

namen to sarata namen to parata | namen pandharinatha bhetavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥ नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥ नाम तें अंजन नामें बोधे मन । नामेंचि निधान चांगया जाला ॥३॥ मार्गीं जातां तुम्ही उर्गेचि नसावें । वाचेसि म्हणावें रामकृष्ण ॥४॥ रामकृष्ण हरी मुकुंदमुरारी । केशव नरहरी नारायण ॥५॥ ऐसा हा सतत आठव नामाचा । नामा म्हणे कैचा दोष तया ॥६॥