भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम एकचि तारक । रामनामें शुद्ध मुख

nam ekachi tarak | ramanamen shuddha mukh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम एकचि तारक । रामनामें शुद्ध मुख । येणें उद्धरती तिन्ही लोक । कुळांसहित वैकुंठ ॥१॥ धन्य धन्य तें कुळ । रामनामें नित्य निर्मळ । जो उच्चारी सर्वकाळ । धन्य जन्म तयाचा ॥२॥ एक हरी एक तत्त्व । तेथें धनोनियां शुद्ध सत्त्व । नाना काय करिसी कवित्व । राम नाम उच्चारी ॥३॥ नामा जपे नाम मंत्र । हातीं न घे आणिक शस्त्र । रामकृष्ण हें वक्त्र । उच्चार इतुकेचि पुरे आम्हां ॥४॥