भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी

nana duhkh maya athavati mana | atan narayana krupa kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी ॥१॥ माझ्या पातकांचा लागूं नेदी अंत । ऐसें माझें चित्त साक्ष असे ॥२॥ ज्ञानाग्नि माझी करा तृणवत । होऊनि कृपावंअत श्रीहरी ॥३॥ योगिराज यासी नाहीं पापदोष । केला उपदेश मुक्ताईनें ॥४॥ नामा म्हणे देवाअ पेटलें अंतर । करा आतां स्थिर योगिराज ॥५॥