भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं

nam gaun nam dhyaun | namen vithobasi pahun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं ॥१॥ आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरिरायाचे ॥२॥ टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीतीं ॥३॥ नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥