भजनी मालिका
← भजनांकडे परत

नानापरिचीं दैवतें । बहुत असती असंख्यातें

nanaparichin daivaten | bahut asati asankhyaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नानापरिचीं दैवतें । बहुत असती असंख्यातें ॥१॥ सेंदुर शेरणी जीं इच्छितीं । तीं काय आर्त पुरविती ॥।२॥ अंध नको होऊं आलीया । भज भज पंढरिराया ॥३॥ सोडूं नको विष्णु त्रिपार-णिया । तोडी कुलूप पाठी गळ टोचोनियां ॥४॥ बाळा अबळा मुकी मौळी । क्षुद्र देवता जीवदान बळी । तेणें न पावती सुख कल्लोंळी । एक विठ्ठलावांचूनियां ॥५॥ नाना धातूची प्रतीमा केली । षोडशोपचारें पूजा केली । दुकळी विकूनि खादळी । तें काय आर्त पुरविती ॥६॥ आतां दृढ धरोनियां भाव । वोळगा वोळगा पंढ-रिराव । आपुले चरणीं देईल ठाव । विष्णुदास नामा ह्मणे ॥७॥