भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी ॥१॥ अहर्निशीं माझें करावें चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नंदें सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासूं देगे याशी दहीं दूध ॥१॥ मजला लेंकरें नाहींत गे फार । विश्रांतीसी घर एवढें आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥ आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख ॥१॥ लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त ॥१॥ वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥ माझें मज कळलें माझें मज कळलें । माझें मज कळलें प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नव जावें तेथें लागे जाणें । न करावें तेंचि लागे करणें । न बोलावें त्यासि लागे बोलणें । पडे मागणें नेदी तया ॥१॥ कृष्णें देवकीये उदरा येणें । कंसा त्यागोनि गोकुळासि जाणें । तेथें नंदा-च्या गाई राखणें । संगतीं असणें गोंवळ्यांच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नवमासवारी म्यां वाहिलासि उदरीं । आस केली थोरीं होसी म्हणोनी ॥१॥ शेखीं त्यां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥ आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे वोझें घेऊनि जड बहु ॥१॥ रंग नानासूत्रिं अनेक पुतळे । तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु ॥१॥ स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग । नाहीं तया मग जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला ॥१॥ येतां जातां हरि हरि हरि वाटे । नाम तें चोखटें स्मरा मुखीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव