भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो नमो गणपति । नमो सरस्वती

namo namo ganapati | namo sarasvati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नमो नमो गणपति । नमो सरस्वती । नमो नमो रमापति । दीनबंधु ॥१॥ नमो योगी दिगंतर । नमो वैष्णवांचिया भारा । नमो गंधर्वा ऋषीश्वरा । लहान थोरां ॥२॥ नमो नमो अंतरीं । नमो नमो दिशा चारी । नमो अंतरबाहेरीं । एकत्व एक ॥३॥ नमो अनंता अनंत-नामा । जानकीश जगज्जीवना । जयजय रामारामा । तुज नमो ॥४॥ नमो मत्स्य कच्छ अवतार । नमो सिंह सुकर । नमो परशुराम फरशधर । वामना तुज नमो ॥५॥ नमो रामा वेदपाळका । नमो इंद्रियेंचालका । नमो बोधभाविका । श्रीविठ्ठला ॥६॥ नमो कलंकी विनटला । पटला विठ्ठला । सारासार नटला । तुज नमो ॥७॥ निरामय निर्णय तुज । नमो नमो चतुर्भुज । नमो सर्व जगदात्मज । अनाथनाथा ॥८॥ नमो बारा ज्योतिर्लिगा । नमो पंढरी पांडुरंगा । नमो भिवरा चंद्रभागा । नमो वैकुंठपीठा ॥९॥ मी काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती । नमन काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती । नमन श्रीपती । मान्य जालें ॥१०॥ नमन निवृत्ति ज्ञानेश्वरा । नमो सोपान वटेश्वरा । नमन मुक्ताबाई निर्झरा । सत्रावींच्या ॥११॥ नमो हंसा सुअक्षरा । नमो व्यापका चराचरा । नमो नमो अव्यक्त विषयावरा । पांडुरंगा ॥१२॥ नमन तुमचें तुम्ही केलें । नमन सहजासहज जालें । नेणें काय आलें गेलें । सद्‌गुरुनाथा ॥१३॥