भजनी मालिका
← भजनांकडे परत

नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच

nalage tujhi bhukti nalage tujhi mukti | maj ahe vishranti vegalich

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥ माझें मज कळलें माझें मज कळलें । माझें मज कळलें प्रेमसुख ॥२॥ न करीं तुझें ध्यान नलगे ब्रह्मज्ञान । माझी आहे खूण वेगळीच ॥३॥ न करीं तुझी स्तुति न वाखाणीं कीर्ति । धरलसि ते युक्ति वेगळीच ॥४॥ नामा म्हणे नाम गाईन विर्विकल्प । येसी आपोआप गिंवसित ॥६॥