भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो काळकौतुहळ । नमो चक्रचालक गोपाळ

namo kalakautuhal | namo chakrachalak gopal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नमो काळकौतुहळ । नमो चक्रचालक गोपाळ । नमो विश्वप्रतिपाळ । प्रभंजन ॥१॥ नमो शिव शिवेशा । नमो शिवादि विश्वेशा । नमो रुपा अष्टदिशा । व्यापका नारायणा ॥२॥ नमो सकळ गर्भोद्‌भवा । नमो चित्तचाळक भावा । नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा । श्रीविठठला ॥३॥ नमो भजनशीळ व्यापका । नमो ज्योतिर्लिंगदीपका । नमो नमो तुज एका । आत्मव्यापका जगद्‌गुरु ॥४॥ नमो श्रीये श्रीनिवासा । नमो आगमपरेशा । नमो ज्ञानगम्याधीशा । प्रतिकुळा ॥५॥ नमो स्वलीळा विनटा । नमोस्तु ते वैकुंठपीठा । नमो रुपादिश्रेष्ठा । वैकुंठीचिया ॥६॥ नमो दर्शनस्पर्शना । नमो उपरतिनिधाना । नमो तितीक्षा दारुणा । कमळालया ॥७॥ नमो त्रिगंटी आदटा । नमो त्रिगुणा तूं उद्‌भटा । नमो सत्वरुप सदटा । ब्रह्मनामा ॥८॥ नमो रजेश्वरा हरी । नमो विगळितसंहारी । नमो वाचा वक्ता करी । वाचाळ वाक्‌पुष्पीं ॥९॥ नमो तमहर्ताकर्ता । नमो सकळसंहर्ता । नमो काळकौळु दाता । रक्षिता हरिभक्तां ॥१०॥ नमो हरिहरेश्वरा । नमो न देखों दुसरा । नमो वेदांत सागरा । सर्वेश्वरा तुज नमो ॥११॥ श्रुती निरामय नमो । नमो ज्ञानरुप गमो । नमो द्वैतनिरसनसमो । करीं तूं निजकरें ॥१२॥ नमो व्यक्ताव्यक्त हरी । नमो मायासंहारकेसरी । नमो सर्वांच्या माजघरीं । नांदसी तूं आत्मारामा ॥१३॥ जीवशिव नमो तुज । ज्ञानविज्ञान तूं सहज । नमो सर्व जीवां बीज । तूंचि श्रीविठ्ठला ॥१४॥ लीलेस्तव नटारंभ । नमो जगदादि अखिलस्तंभ । उभा राहोनी प्रतीभ । भीमातीरीं पंढरीये ॥१५॥ नमो ऐशिया रुपेशा । नमो त्रैलोक्य विस्तारठसा । नमो आदि परेशा । जगदाधीशा युगादी ॥१६॥ नमो पुरुषोत्तम परेशा । नमो सकळही उदासा । करुनि जीवरुपा ठसा । नांदसी तूं चराचरीं ॥१७॥ मधुसूदना तुज नमो । मधुमाधवा ह्रदय रमो । नमो मधुर गीत समो । माजघरीं आत्मयाचिये ॥१८॥ त्रिविधतिमिर नाशा । परम परमानंदा उल्हासा । नमो पुरविसी आशा । हरिभक्तांची श्रीहरी ॥१९॥ नमो वासाना चक्रचाळी । नमो तुंडवितंड गेली । नमो सर्वही हरली । प्रपचंरचना ॥२०॥ नमो श्रीधर श्रीकर । नमो सर्व संगीम निर्विकार । नमो विकृती विकार । हरिसी नामें एकें ॥२१॥ नमो शांती दया क्षमा । नमो कृपाकर पुरुषोत्तमा । नमो कांसवदृष्टीसमा । निष्कलंक नाथा ॥२२॥ नमो द्विविध छेदका । नमो एकार्णव पावका । नमो द्वादश अर्का । सुभाषका वेद वक्त्या ॥२३॥ नमो चित्त चकोर हर्त्या । नमो सर्वकारण कार्यकर्त्या । नमो तुजवांचोनि सत्या । विवेक प्रत्यया पैं न ये ॥२४॥ नमो अद्वैत अनंता । नमो निर्द्वद्व भोक्ता । नमो नित्यानित्य सरता । तुज नमो नमो ॥२५॥ नमो दुर्गतिहरणा । नमो सर्व हरण भरणा । नमो शिव शक्ति समलिंगा । नमा भक्षक काळवेगा । रुद्रादित्या वसु पैं गा । सम सर्वांगा परम परेशा ॥२७॥ नमो कृत्रिम दहना । नमो कृश करण हरणा । नमो प्रतिपाळ करणा । नारायणा तुज नमो ॥२८॥ नमो इंद्रिय नियंत्या । नमो प्रपंच अकृत्या । नमो दीनादित्या । सकळ वृद्धि तूंचि ॥२९॥ नमो अवधूत दत्ता । नमो अपरमित मिता । नमो सर्वां वरिष्ठ सत्ता । तूं चाळिता ह्रषिकेशी ॥३०॥ नमो दृष्ट दर्पादर्पा । नमो चमत्कार गंगा सर्पा । नमो नमो हरण पापा । नमो स्वल्पा रामकृष्णा ॥३१॥ नमो चतुर वेद दीप्ता । नमो हरण करण तूम तुप्ता । जागृति स्वप्न गुप्ता । सत्य सुप्ता महाविष्णु ॥३२॥ नमो देवेश्वरा सूक्ता । महा मोहा हर्ता । मंद मंद नियंता । नमो नारायणा ॥३३॥ क्षीर नीर निर्झरा । नमो विद्वद अनुकारा । नमो विवेक सागरा । महानादा ॥३४॥ नमो मुखदंतसदना । नमो भक्षक भुवना । शुक्लांबरा शुक्लवर्णा । दयाघना गुणनिधी ॥३५॥ मृतामृत नमो नमो । नमो श्रुतिशास्त्र समो । नमो हा गर्व गमो । पद्मगर्भानंतानंता ॥३६॥ नमो चिदाकाशव्याप्ता । चित्सत्ता चळण सत्ता । चित्स्वरुपादिरुपा । भुवन दीपा महामूर्ती ॥३७॥ नमो एक एकार्णव । नमो कल्पादि गुण वैभव । नमो सकळ हे देव । हे भाव पैं तुझे ॥३८॥ गो गोपाळ नमो नमो । गोविंद गुणविष्णु धर्मो । नमो चित्त चिंतनी रमो । सर्वकाळ तुझ्या चरणीं ॥३९॥ ध्वज वज्रांकुशा । ध्वजनीळ विकासा । ध्वजांबरा अष्ट दिशा । नीळिमा भासती शामांकिता ॥४०॥ सुषुप्तीचे जें सत्य । तें नमो तुज कृत्य । असोस ज अमित्य । तें तें क्षमा करी स्वामी ॥४१॥ नमो निर्धार नियंता । नमो सुखरुप दाता । नमो आलिया पदार्था । क्षमा करी स्वामीं ॥४२॥ नमो चित्त विभ्रमा । नमोधार्य धैर्य नेमा । नमो पुराण पुरुषोत्तमा । पाहे कासव दृष्टी ॥४३॥ पसाय दाना नमो । परम परेशा समो । ध्यनांतर गमो । तुझ्या चरणीं केशवा ॥४४॥ आग्रह नियंत्या नमो । सग्रह परी नमो । अनंता नित्य धर्मो । वैकुंठ गुण ग्राम नमो नमस्ते ॥४५॥ अनादृश दृश्यमाना । दृशादृश्य नित्यघना । सुखरुप जगजीवना । तुज नमो स्वामी ॥४६॥ दीप्तादीप्त अदृश्य । जीवन दिसती सादृश्य । जीवमय हें भाष्य । तुज नमो स्वामी ॥४७॥ परम पर ब्रह्मा । आदि ब्रह्मा तूं रामा । भक्तांलागीं साउमा । तुज नमो ॥४८॥ नमो नमो एक तत्वा । बाह्य मुद्रा शुद्ध सत्वा । योगा रुढ परतत्वा । सबाह्य पावसी तुज नमो ॥४९॥ वेदादि परम वक्ता । वेदादि तूंचि कर्ता । तुजवांचोनि सर्व सत्ता । नमो भोक्ता न देखों ॥५०॥ ज्योतिर्मय रुप तुझें । सर्व तत्वां तूंचि बीज । नमो तुज सहज । पुढती पुढती नमो नमो ॥५१॥ परब्रह्म परात्पर । परम तत्व परम सार । परम गुह्य परम विचार । तुज नमो नारायणा ॥५२॥ दिघड बिघड सुघडा । जाडा जाड अवघड । द्वैता द्वैत जोडाजोड । कर्ता कार्यता तुज नमो ॥५३॥ संख्या रहित जीवना । असंख्य जीव पाळणा । नमो तुज संजीवना । पुंडलिकधना पांडुरंगा ॥५४॥ निर्गुण सगुण रुपा । देवा देव तूं सोपा । तुझी जाहलिया कृपा । नमन बापा तुझ्या चरणीं ॥५५॥ नमो नमो तारका । तूं ब्रह्म नामा निशेखा । नमो तुजवांचोनि सखा । योगीयासी पैं नाहीं ॥५६॥ जुगादि जुगत्रय । जुग जोग योगमय । हे तुज पासाव होय । ऐसिया तुज नमो ॥५७॥ नमो नमो नम । नाहीं नाहीं तुजसी सम । ऐसा परापश्यंती नेम । वदलिया चारी ॥५८॥ चहूं मुक्ति परतत्वा । पंचभूजा शुद्ध सत्वा । षड्‌ मार्ग गुण सत्वा । ग्रास न करिसी तुज नमो ॥५९॥ विद्वद चिद्विलासा । भानुबिंबा प्रति प्रकाशा । नेमो तेज तेजसा । आदिसूर्या ॥६०॥ ऐसा चहूं ग्रंथाचा क्लेशु । वाउगाचि वाहे सोसू । त्रिमिर त्रिगुण असोसू । तो सत्वांशु तोडी माझा ॥६१॥ साहीं नाडी नक्र भ्रमें । वाहातां इंद्रियांची ग्रामें । ते अडखळोनि साउमे । नये ऐसें करीं नमो ॥६२॥ बाध्य बाधा कर्माची । सर्व सत्ता या भ्रमाची । नमनें करुनियां तुमचीं । तुम्हासी अर्पिलीं स्वामी ॥६३॥ यम धर्माचिया सत्ता । कर्म धर्माचिया पंथा । कर्मधर्म विधाता । ऐसिया नेमिता तुज अर्पिला ॥६४॥ दश शम समान । इडा पिंगळा सुशुम्न । साही चक्रें दरुषन । तुझीं तुज अर्पिलीं ॥६५॥ मन पवन योग धारण । तूं यासी पैं कारण । समतुकें अवघे गुण । तुझ्या चरणीं निक्षेपिलें ॥६६॥ हें भूत भौतिक प्रचंड । जन्म उत्पत्तीचें अंड । जन्म जुगादि ब्रह्मांड । खंड विखंड तूं जाणता ॥६७॥ प्रचुर चर्या चित्ताची । धावन वळण अकोंचनाची । सूचना जे चमत्काराची । ते हि अर्पण तुज सदां ॥६८॥ निर्वासना वासना युक्त । गुंफले राहिले जेथें चित्त । तेथें तूं धावोनि अनंत । सोडविसी वासनामय ॥६९॥ सूक्ष्म अविचारा बोला । बोली नातुडे व्यर्थ गेला । तो म्यां बुझावोनि संबोखिला । मग लाविला तुझ्या पंथीं ॥७०॥ नित्य धर्माचिया वोळी । चळल्या चुकल्या कोण चाळी । त्यासी वेद तुझा पाळी । त्या तूं सांभाळी परब्रह्म ॥७१॥ श्रृति स्मृतिंची वचनें । याची अंगराग मार्गस्थानें । कीर्तनीं गुण वर्णनें । हे हि नारायणें अंगीकारावीं ॥७२ उदंड विदंड वितंड । देह द्व्याचे अभंड । जे जे दिसे भ्रंश अंडांड । ते शुभ्र चंड सांभाळी ॥७३॥ देह भरणाची ममता । देह पोखिती जे सत्ता । त्याहि वरील सूक्ष्मता । ते कृपावंता सांभाळी ॥७४॥ त्रिमिर त्रिगुण अवघे । जें जें आलें असेल वोघें । तें तें मी नेघे । तें तूं सकळ वेगें सांभाळीं ॥७५॥ योनीचिया कष्टा । वरी वासना होती भ्रष्टा । त्या त्या करुनि प्रविष्टा । रत जालों तुझ्या चरणीं ॥७६॥ विद्या वयसा कुळ । ब्रह्म कर्म आचारशीळ । गेले आले विव्हळ । ते तूं दयाळ सांभाळी ॥७७॥ नाना जन्म अवतार । नाना शाखांचे निर्धार । नाना गोत्र उच्चार । तुझा विचार तूं जाणसी ॥७८॥ पाठ वेदादि वचनें । शास्त्रदृष्टी अवलोकनें । कीर्तनी गुण वर्णनें । हें हि नारायणें अंगीकारावी ॥७९॥ सर्वमय सर्व सपाट । त्यावरी करुनि चालिलों वाट । चंद्र सूर्य नक्षत्रें घनदाट । करुनि एकवट पायरी ॥८०॥ सर्व अंडाचे ब्रह्मांड । मी न म्हणे अंडांड । खंडें करुनियां विखंड । प्रचंड मी तुजसी बोलें ॥८१॥ रोमरंध्रीं ब्रह्मांडें । सकळ विराटमय खंडें । ऐसी महत्तू ब्रह्म प्रचंडें । तुझ्या अंगीं दातारा ॥८२॥ तूं विश्वरुपाची घडी । तारक ब्रह्मचि उघडी । मियां निज दृष्टीनें चोखडी । तुझी मूर्ति न्याहळिलो ॥८३॥ तें न सुटे निजकळे । येर्‍हवी हें ना कळे । तुझ्या कृपागुणें आकळे । तुझिया दासा निज भक्तां ॥८४॥ अनंत या नामाचा संकेत । मन मुरालें जेथें निर्धूत । तूंपणे परमाद्‌भुत । परमानंदा ॥८५॥ गुणाग्र गोसावी राम । गुण समुद्र गुण ग्राम । सकळ भूतांचा विश्राम । तुज नमो ॥८६॥ नमन केलिया विभूतीं । चित्त रमलें जाली विश्रांती । तुज देखिलिया श्रीपती । न राहे चित्तीं तळमळ ॥८७॥ नमन हेंचि थोर दिसे । एर्‍हवीं तरंगाकार भासे । देखिलें तुतुकें नासे । नैश्वर्य ऐसें श्रुति बोले ॥८८॥ नमन हेंचि परम । नमन हेंचि सुवर्म । नमन हेंचि आत्माराम । करुं निघाली ॥८९॥ नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव । नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तूं पावसी ॥९०॥ नमन हेंचि श्रेष्ठ पीठा । नेतसे तुझिया वाटा । तुज ऐसा श्रेष्ठा । मग वाटा काय कराव्या ॥९१॥ नमन हेंचि तारक । नमन हाचि विवेक । नमनेंविण त्रैलोक्य । आडमार्गीं रिघताती ॥९२॥ नमन लटिकें नव्हे नव्हे । नमन भलतियासी न साहे । जैं साह्य सखा होय । श्री निवृत्ती ॥९३॥ नमन एवढा मंत्र । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । विचार लक्षण पात्र । तोचि जाणे येथींचे ॥९४॥ नमन करी ब्रह्मा श्रेष्ठा । नाभीकमळीं धरी वैकुंठा । नमन करी नीळकंठा । तीर्थें मस्तकीं वंदिती ॥९५॥ इंद्र चंद्र महेंद्र थोर । नमनेंविण नैश्वर । अंडामध्यें चराचरा । नमनेंविण न तरती ॥९६॥ नमस्ते नमस्ते नमस्ते । पुढतीं पुढतीं नमस्ते । समाधिसुख आस्ते । नमो नमन करितां ॥९८॥ नमो नमो आदि पीठा । शिवादिक वरिष्ठा । येथें येऊनि वैकुंठा । समाधि शेज घातली ॥९९॥ महाविष्णू तूं योगरुपा । महारुपाचिया स्वरुपा । महादित्या अमूपा । कोटी सूर्य तेजसा ॥१००॥ शंखचक्रानें मंडित । करकमळ तुझे मिरवत । पदक ह्रदयावरी शोभत । आणि श्रीवत्सलांछन ॥१०१॥ अनंत बाहूंचा मेळ । तो तूं चतुर्भुज गोपाळ । मुगुट विराजित तेजाळ । कोटी सूर्यहुनि प्रभा ॥१०२॥ पितांबर माळ कंठीं । सर्वांगीं चंदनाची उटी । हिरे माणिक कटीतटीं । अनेक कीळा फाकती ॥१०३॥ क्षुद्र्घटिकाचिया वोळी । घणघणाट तया तळीं । देहुडा पाऊलीं निश्चळीं । वेणु वाजविसी सुस्वरें ॥१०४॥ रुणुझुणु रुणुझुणु । ऐसा वाजविसी वेणू । सुंदर तूं श्यामतनु । अळंकापुरीं उभा अससी ॥१०५॥ सभोंवते गोपाळ तुझे । ते अंतरंग पैं सखे माझे । पुंडलिक तरि सहजे । प्राण सखा पैं माझा ॥१०६॥ ऐसा ज्ञान उद्‌बोध बोले । ज्ञानांजन निरसलें । विज्ञानहि हारविलें । दृश्य द्रष्टेंपणेसी ॥१०७॥ बापरमुमादेवीवरु । समाधि देऊनियां स्थिरु । वरी ठेवोनियां अभय करु । वर देऊनि राहिला ॥१०८॥