भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे

navhe tenchi kaisen jhalenre kheliya | nahin tanchi disun lagalenre | arup hoten ten rupasi alen | jiv shiv nam pavalenre

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥ आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥ ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें जाणुनि खेळ खेळेरे ॥धृ०॥ ब्राम्हणाचें पोर एक खेळासि भ्यालें । तें बारा वर्षें लपालेंरे । कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलेंरे ॥३॥ साहा तोंडया एक संभूचें बाळ त्यानें । बहूतचि बळ आथियेलेंरे । खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलेंरे ॥४॥ चहूं तोंडयाचा पोर एक नारयाहि जाण । तो खेळिया माजी आगळारे । कुचालि करुनी पोरें भांडवी । आपण राहे वेगळारे ॥५॥ गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें रानारे । खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहाणारे ॥६॥ खेळिया माजी हनुम्या शहाणा न पडे कामव्यसनींरे । कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैचा तेथें कैचें भांडणरे । रामा गडयाची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणरे ॥७॥ यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहूतचि खेळलारे । लहान थोर अवघे मारिलीं । खेळचि मोडूनि गेलारे ॥८॥ ऐसे खेळिये कोठयानकोटी गणित नाहीं त्यालारे । विष्णुदास नामा म्हणे वडीलहो पहा देहीं शोधुनीरे ॥९॥