भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव जावें तेथें लागे जाणें । न करावें तेंचि लागे करणें । न बोलावें त्यासि लागे बोलणें । पडे मागणें नेदी तया

nav javen tethen lage janen | na karaven tenchi lage karanen | na bolaven tyasi lage bolanen | pade maganen nedi taya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नव जावें तेथें लागे जाणें । न करावें तेंचि लागे करणें । न बोलावें त्यासि लागे बोलणें । पडे मागणें नेदी तया ॥१॥ कृष्णें देवकीये उदरा येणें । कंसा त्यागोनि गोकुळासि जाणें । तेथें नंदा-च्या गाई राखणें । संगतीं असणें गोंवळ्यांच्या ॥२॥ राम वान्नरांची सेवा करी । पांडव कौरवांचे घरीं । हरिश्चंद डोंबाघरीं पायकी करी । हें अपूर्ण परियेसा ॥३॥ रुद्रें अंजनी उदरा येणें । रामाची सेवा वा-न्नरपणें । प्रसंग पडे तैसें वर्तणें । रुसणें नलगे कवणासी ॥४॥ स्वामी-नें सेवकाची सेवा करणें । नुपेक्षी कदन्न भक्षणें । ह्मणवूनि अहंकार न धरणें । विषम संसार अरे जना ॥५॥ अवचट घडविती तुझिया भावा । घोर विस्मय होतो माझिया जीवा । विष्णुदास नामा वि-नवी केशवा । देवा तूं करिसी तें बरवें ॥६॥