भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥ तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि ॥१॥ दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पित देह कल्पित प्रबंध । कल्पित षट् चक्रमाळा । कल्पित धारण कल्पित सुषुम्ना । कल्पित मेरुमंडळ रे ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥ तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥ धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥ ऐसे वर्म सोपें सांडोनी शिणती । वायां हीन होती हांव भरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कष्ट न करितां योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कां बा ॥१॥ नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥ साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळें पत्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥ नाम हें चांगलें रुप हें चांगलें । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटीं तो गळां । यमपाश पडतील ॥१॥ वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥ वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय दुःख रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ