भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥ मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥ आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥ रुप सांवळे शोभें विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करा रे बापानों साधन हरीचें । झणीं करणीचें करुं नका ॥१॥ जेणें नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करा हरिभक्ती संतांचें पूजन । व्रत एकादशी रात्रो जाग्रण । वासुदेव नामाचें मुखीं उच्चारण । तेणें न होय बंधन यमाचें ॥१॥ रामकृष्ण वासुदेव वदे । रामकृष्ण वासुदेव ॥ध्रुव॥

रचनाकार: संत एकनाथ

करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥ आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचें विठोबाई वदे कां रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥ करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥ नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊं पाहें ॥१॥ द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ