भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें

kamalanetra pahatan man majhen bhulalen | yogi dhyati jayaten rup pandhariye alen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥ आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥ योगयाग तप न लगे आचरण कांहीं । सुलभ सोपारा वसे सर्वांठायीं ॥३॥ वेदशास्त्र श्रमलें पुराणें भांडतीं । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥ एका जनार्दनीं पहात आनंदें मन । तद्रुपति झालें जनीं सर्व जनार्दन ॥५॥