भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा

karitati katha | dravya magati sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा ॥१॥ नाहीं पुण्य दोघां गांठीं । हीन भाग्य तीं करंटीं ॥२॥ नैराश्य कथा भजन । तेणें तुष्ट नारायण ॥३॥ एका जनार्दनीं वाणी । व्यास बोललें पुराणीं ॥४॥