भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां विषयाचें ध्यान । जीव होय मनाधीन

karitan vishayachen dhyan | jiv hoy manadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करितां विषयाचें ध्यान । जीव होय मनाधीन ॥१॥ ऐसें भुलले विषयासी । अंचवले परमार्थासी ॥२॥ संसार सागरीं वाहिला । गोड परमार्थ राहिला ॥३॥ गेलें भुलोनियां मन । विसरला आठवण ॥४॥ जन्मा येवोनियां देख । एका जनार्दनीं ते मूर्ख ॥५॥