भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा

karaven pujan mukhin namasmaran | anudinin dhyan santaseva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥ आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचें विठोबाई वदे कां रे ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे सांगात । त्यांचे वचनें मात कळों येत ॥३॥