भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां अनुष्ठान । मन धांवे सहज जाण

karitan anushthan | man dhanve sahaj jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करितां अनुष्ठान । मन धांवे सहज जाण ॥१॥ मंत्र जंत्र यंत्र भेद । मनें केला वादावाद ॥२॥ आधीं मनातें जिंकावें । सहज रूप मग पहावें ॥३॥ मन करे आधीन आधीं । एका जनार्दनीं तुटे व्याधी ॥४॥