भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळला गुरुसी वृत्तान्त । आले वन धुंडाळीत

kalala gurusi vruttanta | ale van dhundalit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळला गुरुसी वृत्तान्त । आले वन धुंडाळीत ॥१॥ गुरु शिष्या हांका मारी । तिघे आले त्या अवसरीं ॥२॥ पोटासी धरुनी आणिलें घरां । उतरिला काष्ठभारा ॥३॥ मुख कुर्वाळुनी हातें । वर दिला सदगुरुनाथें ॥४॥ म्हणे मागा गुरुदक्षिणा । एका विनवी जनार्दना ॥५॥