भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी

kala to abhyas kasaya karanen | nivrutti nam ghenen dhanivari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥ धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥ व्यर्थ खटपट न करी पसार । निवृत्ति नामें साचार जप करीं ॥३॥ गुज गुह्य तुज सांगतों मना । निवृत्तिनाम जाणा ह्रदयीं धरीं ॥४॥ एका जनार्दनीं निवृत्ति नाम वाचे । संसाराचे साचें सार्थक जालें ॥५॥